Saif Ali Khan News : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर कोणी अडचणीत येणार? किती कोटींचं नुकसान होणार?

TV Marathi News
0

Saif Ali Khan Highlight : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर कोणी अडचणीत येणार? किती कोटींचं नुकसान होणार?


Bollywood Actor बॉलिवूड अभिनेता Saif Ali Khan Highlight सैफ अली खान याच्यावर झालेल्या भयंकर हल्ल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. गुरुवारी मध्यरात्री सैफच्या निवासस्थानी चाकूने वार करण्यात आले, ज्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, शस्त्रक्रियेनंतर सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, या हल्ल्यामुळे फक्त सैफच नाही, तर संपूर्ण बॉलिवूडला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता!

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खान तब्बल आठ सिनेमांमध्ये झळकणार होता. पण या हल्ल्यानंतर त्याला काही काळासाठी विश्रांती घ्यावी लागेल. त्यामुळे या सिनेमांच्या शूटिंग शेड्यूलमध्ये मोठा बदल होणार असून,
निर्मात्यांचं कोट्यवधींचं नुकसान होऊ शकतं.

कोणकोणते सिनेमे लांबणीवर जाणार?

सैफ Saif ‘ज्वेल थीफ: द रेड सन चॅप्टर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. मात्र, आता दिग्दर्शकाने चित्रिकरण तात्पुरतं थांबवलं आहे. याशिवाय सैफ अली खानच्या हातात ‘रेस 4’, ‘स्पिरिट’, ‘देवरा: पार्ट 1’, ‘देवरा: पार्ट 2’ यांसारखे मोठे प्रोजेक्ट आहेत.

तसेच, तामिळ दिग्दर्शक बालाजी मोहन यांच्या ‘क्लिक शंकर’ आणि संजय गुप्ता यांच्या ‘शूटआऊट एट बायकुला’ या सिनेमांसाठीही सैफने करार केला आहे. विशेष म्हणजे, तो पहिल्यांदाच आपल्या लेक सारा अली खान हिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रोजेक्ट्सचं भवितव्य आता अनिश्चित झालं आहे.

हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं?

हल्ल्यानंतर सैफचा मुलगा Ibrahim Ali Khan इब्राहिम अली खान याने वडिलांना रिक्षातून लीलावती हॉस्पिटल Lilavati Hospital येथे दाखल केलं. तिथे तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हल्ल्यातील एक वार मणक्यावर बसल्याने त्याच्या स्पायनल कॉर्डला मोठा धक्का बसला आहे, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे.


चित्रपटसृष्टीला मोठा धक्का

सैफ अली खान Saif Ali Khan हा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध स्टार असून, त्याचे आगामी सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजण्याची शक्यता होती. मात्र, या हल्ल्यानंतर निर्मात्यांच्या डोक्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पुढे काय होणार, हे सैफच्या प्रकृतीवर आणि त्याच्या रिकव्हरीवर अवलंबून असेल.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)