“राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नवीन दिशा द्या - शरद पोंक्षे”

TV Marathi News
0

 


शरद पोंक्षे यांचे ठाम मत: "अ, ब, क, ड पैकी आम्ही अ आणि ब ला निवडून दिले, पण क आणि ड नको होते. मात्र काही जण रुसले आणि अ बरोबर ड एकत्र आले"


महाराष्ट्रातील राजकारणातील उलथापालथीवर बोलताना प्रसिद्ध अभिनेते आणि विचारवंत शरद पोंक्षे यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर परखड मत मांडले. अविनाश जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना पोंक्षे म्हणाले, "सोन्यासारखा महाराष्ट्र घडवण्याच्या ध्येयाने अविनाश जाधव दिवस-रात्र झगडत आहे." त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राला


शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणारं आणि प्रगतीकडे नेणारं नेतृत्व हवं आहे.


  शिवाजी महाराजांचे नाव वापरणारे राजकीय खेळ

शरद पोंक्षे यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या नेत्यांवर टीका केली. "शिवाजी महाराज हा एकच राजा होऊन गेला. आज महाराष्ट्राला 288 सच्च्या सेवकांची गरज आहे, जे विधानसभेत जाऊन राज्याचा विकास साधू शकतील," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.


 राज ठाकरे Raj Thackeray यांचा प्रामाणिक दृष्टिकोन


शरद पोंक्षे यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला आणि म्हटलं, "राज ठाकरे त्यांच्या चष्म्यातून जात-धर्म बघत नाहीत. त्यांना महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक आणि संतांचे विचार जपून पुढे नेण्याची क्षमता आहे. फक्त राज ठाकरेच महाराष्ट्राला नव्या ऊर्जेने पुढे नेऊ शकतात."


 राज ठाकरेंना Raj Thackeray बळ द्या आणि विकासाच्या वाटेवर चला


शरद पोंक्षे यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना आवाहन केलं, "शिवसेनेने जशी नवीन नेत्यांना पक्षात घेतलं, तसं राज ठाकरेंना बळ देण्याची वेळ आली आहे. विकासासाठी बुलेट ट्रेनची गरज पडणार नाही, फक्त राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली इंजिन अधिक वेगाने धावेल."

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)