स्वच्छ भारत अभियान की स्वच्छ फसवणूक? अचलपूर शहरात गोंधळ माजला!”
“अचलपूर शहरात घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर! ठेकेदाराची मनमानी, प्रशासन मौन…”
प्रतिनिधी सैय्यद असलम/TvMarathiNews
अचलपूर शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडालाय...!
नगर परिषदेच्या घनकचरा संकलनाच्या ठेक्याला लाखो रुपये मंजूर झालेत, पण काम मात्र अर्धवटच सुरू आहे.
घनकचरा दोन-दोन दिवसानं उचलला जातोय... परिणामी शहरातील रस्ते, गल्लीबोळ आणि बाजारपेठा कचरानं भरून गेल्यात!
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आधी रोज सकाळी घंटागाडी घराघरात येत होती…
पण आता अनेक भागात ती गाडीच दिसत नाही!
ट्रॅक्टरही कमी झालेत…
मुख्य बाजारपेठ, गांधी पुल चौक, देवडी चौक, कासदपूरा, फरमानपुरा, आणि नगरमध्ये तर कचर्याचे ढीग दिवसेंदिवस वाढतायत.
दिवाळीच्या काळातही ‘स्वच्छता अभियान’ची धज्जी उडाली!
सणासुदीच्या दिवसांतही शहरात दुर्गंधी, माशा आणि डासांचं प्रमाण वाढलं…
नागरिक त्रस्त, पण प्रशासन मात्र गप्प!
शहरातील जनतेनं प्रशासनाकडे मागणी केलीय की ठेकेदाराच्या कामाची चौकशी व्हावी आणि जबाबदारी निश्चित करावी.
अर्धवट कामासाठी ठेकेदाराला पूर्ण बिल का दिलं जातं, हा मोठा प्रश्न आता उभा राहिलाय!
मुख्य प्रश्न:
-
ठेकेदाराच्या मनमानीनं शहरात गोंधळ का?
-
प्रशासनातील निरीक्षक मौन का?
-
दिवाळीतही स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं जबाबदार कोण?
📍 अचलपूर शहर आज उत्तर मागतंय —
“स्वच्छता अभियान हे फक्त बोर्डावरचं नाव आहे का, की प्रशासन खरंच जागं होणार आहे?”


