““देवडी चौकात बेशरम झाड लागवड आंदोलन — रिपाईकडून नगरपरिषदेला अंतिम इशारा” अंतिम इशारा”

TV Marathi News
0

 अचलपुर शहरातील देवडी चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे ‘बेशरम झाड लागवड


’ 

आंदोलन — नगरपरिषदेकडे लक्ष वेधले





अचलपुर (प्रतिनिधी): सैय्यद असलम 

अचलपुर शहरातील देवडी चौक परिसरातील सार्वजनिक शौचालय व रस्त्यांच्या अत्यंत दयनीय अवस्थेविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) अचलपुर शहर शाखेतर्फे आज अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रतीकात्मक स्वरूपात ‘बेशरम झाड लागवड’ करून प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा निषेध नोंदविण्यात आला.


या आंदोलनाचे नेतृत्व रिपाई शहराध्यक्ष किशोर मोहोड यांनी केले. या वेळी प्रमुख उपस्थिती मुकेश अग्रवाल, सुनिल लाड, राम खंडेलवाल, ममदु राजा, असलम खान, श्याम खंडेलवाल, रमेश पुरोहित, लवकेश खंडेलवाल, मनोज अग्रवाल, हादीकnull कासवडिया, प्रणय जुनघरे, भुपेरा अग्रवाल, मुस्ताक अहमद, भगवानदास शर्मा यांसह शेकडो कार्यकर्त्यांची होती.



रिपाईतर्फे नगरपरिषद अचलपुरच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले असून त्यात नमूद करण्यात आले आहे की —

देवडी चौक व देवी रोड परिसर हा अचलपुर शहरातील गजबजलेला भाग असून दररोज हजारो नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि महिला या मार्गाने प्रवास करतात. परंतु या भागात स्वच्छतेचा आणि पायाभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असून, सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट आहे. विशेषत: महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ प्रसाधनगृहाचा अभाव असल्यामुळे त्यांना प्रचंड गैरसोय भासते.


शहराध्यक्ष किशोर मोहोड यांनी सांगितले की,


 https://youtu.be/M8963GnCQ2c


 “महिला व नागरिकांना होणाऱ्या या त्रासाकडे नगरपरिषद जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. देवडी चौक व देवी रोड परिसरात स्वच्छता, प्रकाशयोजना, रस्त्यांची दुरुस्ती आणि महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची तातडीने व्यवस्था करावी. अन्यथा 30 दिवसांच्या आत उपाययोजना न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.”

आंदोलनादरम्यान देवडी चौकात लावण्यात आलेल्या ‘बेशरम झाडा’चे प्रतीकात्मक महत्त्व स्पष्ट करत कार्यकर्त्यांनी सांगितले की,

“ही झाडे म्हणजे प्रशासनाच्या बेशरम वृत्तीचे प्रतीक आहेत. नागरिकांच्या समस्या पाहूनही डोळेझाक करणाऱ्या शासनव्यवस्थेविरुद्ध हा निषेध आहे.”

या आंदोलनाचे शहरातील नागरिकांनी स्वागत करत रिपाई कार्यकर्त्यांचे कौतुक केले. अखेरीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अचलपुर शहर शाखेने एक महिन्याचा अंतिम इशारा देत स्पष्ट केले की, समस्या न सुटल्यास आमरण उपोषण करून पुढील तीव्र आंदोलन छेडले जाईल.

“देवडी चौकात बेशरम झाड लागवड आंदोलन — रिपाईकडून नगरपरिषदेला अंतिम इशारा”


👉“महिलांसाठी स्वच्छता सुविधा, रस्त्यांची दुरुस्ती आणि प्रकाशयोजनेची मागणी; 30 दिवसांत निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण”




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)