जालनाचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर एसीबीच्या जाळ्यात कसे पडले?

TV Marathi News
0

 जालनाचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर एसीबीच्या जाळ्यात कसे पडले?


 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले




जालना | प्रतिनिधी :

जालना शहरातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालना महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. या कारवाईमुळे जालना प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

https://youtu.be/EgzFK_OaAac


https://youtu.be/EgzFK_OaAac

एसीबीच्या माहितीनुसार, एका खासगी कंत्राटदाराकडून बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांनी तब्बल दहा लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने ही बाब एसीबीकडे नोंदवली. एसीबीने सापळा रचत कारवाई केली आणि अखेर खांडेकर लाच घेताना रंगेहात पकडले गेले.



या घटनेनंतर एसीबीकडून जालना महानगरपालिकेत झाडाझडती सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात शोध मोहिम राबवली जात असून, काही महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.


दरम्यान, वकील रिमा खरात यांनी तपास यंत्रणेला मागणी केली आहे की, प्रभारी आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात यावी. “आयुक्तांनी गोरगरिबांची घरं पाडली, त्याचाच हा परिणाम आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.


या कारवाईवर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “एसीबीकडून झालेली कारवाई पूर्णपणे योग्य आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”


याचदरम्यान, जालना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, महापालिकेतून पाच ते सहा फाईल्सच्या गोन्या गायब करण्यात आल्या आहेत. या सर्व फाईल्समध्ये विविध कंत्राटे आणि बांधकामाशी संबंधित कागदपत्रे होती. कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की, “महापालिकेच्या जमिनींच्या विक्रीतही मोठा घोटाळा झाला असून, काही जमिनी बड्या लोकांच्या नावे विकल्या गेल्या आहेत.”


या सर्व प्रकारामुळे जालना महापालिकेत भ्रष्टाचाराचे मोठे जाळे उघडकीस येत असल्याचे स्पष्ट होत आहे. एसीबीकडून पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




मुख्य मुद्दे :


* एसीबीने जालना महापालिकेचे प्रभारी आयुक्त रंगेहात पकडले

* कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेताना अटक

* एसीबीकडून महापालिकेत झाडाझडती सुरू

* महापालिकेतून फाईल्स गायब केल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

* भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आणखी उघड होण्याची शक्यता




संपादनः TV Marathi 24 News डिजिटल डेस्क

“सत्याच्या शोधात… प्रत्येक बातमी महत्त्वाची!”

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)