चांदूर बाजार नानोरी फाट्यावर गुटख्यासह 6.83 लाखांचा मुद्देमाल जप्त

TV Marathi News
0

 चांदूर बाजार Chandur Bazar नानोरी फाट्यावर कारवाई

गुटख्यासह 6.83 लाखांचा मुद्देमाल जप्त


तपासणी पथकाची 


कारवाई


चांदूर बाजार : आगामी विधानसभा निवडणुकीचे

पार्श्वभुमीवर निवडणुक आयोगाने अचलपुर मतदार संघातील चांदूर बाजार तालुक्यात ठिकठिकाणी तपासणी पथकाची तैनाती केली आहे. नानोरी फाट्यावरील तपासणी पथकाने दि. ४ नोव्हेंबर सकाळी ८.१५ वाजता केलेल्या वाहनांच्या तपासणीत एका पिकअप चार चाकी वाहनात अवैध गुटख्याची वाहतुक होत असल्याचे दिसल्यावरुन

केलेल्या कारवाईत ४ लाखाच्या


पिकअप व्हॅनसह ६ लाख ८३ हजार ५५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाईसाठी प्रकरण Vidhan Sabha Election निवडणुक निर्णय अधिकारी अचलपुर विधानसभा मतदार संघ बळवंत अरखराव यांचेकडे सादर केले आहे.

४ नोव्हे. रोजी सकाळी ८.१५ वाजताचे सुमारास निवडणुक

तपासणी पथकाने चांदूरबाजार शहरानजीक नानोरी फाट्यावर

वाहनांची तपासणी केली. यात मोर्शी वरुन चांदूरबाजार कडे येणाऱ्या पिकअप व्हॅनएमएच ४७ ईओ ७४७ या वाहनात नजर ५००० या अवैध गुटख्याची वाहतुक होत असल्याचे आढळले. पथकाने वाहनाची चौकशी केली असता सदर वाहन रिजवान अहमद वहिदखान संगम चौक पेठपुरा मोर्शी यांचे मालकीचे असल्याचे स्पष्टझाले. सदर वाहनात बंदी असलेल्या नजर ५००० या गुटख्याचा साठा सापडला. यात १५ गोणी, एका गोणीत छोटी सहा गोणी असा एकुण ४४१० पॅकेट गुटखा असा माल जप्त करण्यात आला. या कारवाईत ४ लाखाच्या पिकअपवाहनव अवैध गुटखा असाएकुण ६ लाख ८३ हजार ५५० रुपयाचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईत पथक प्रमुख अभिजित गुल्हाने यांचेसह प्रविण सोळंके व पोलीस कर्मचारी विशाल भोयर सहभाग घेतला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)