पवार कुटुंबात पाडव्याच्या दिवशी फूट? शरद पवार यांची स्पष्ट प्रतिक्रिया

Khoj news 24
0

बारामती, दिवाळी पाडवा : पवार कुटुंबामध्ये एकत्र दिवाळी साजरी करण्याची परंपरा जुनी आहे. विशेषतः पाडव्याचा उत्सव गोविंद बागेत एकत्र साजरा करण्याची त्यांची प्रथा आहे. परंतु, यंदा अजित पवार यांच्या गैरहजेरीतच पाडवा साजरा झाला. बाकी सर्व कुटुंबीय मात्र गोविंद बागेत उपस्थित होते. शरद पवार Sharad Pawar यांनी बोलताना स्पष्ट केले, "अजित पवार Ajit Pawar उपस्थित असते तर मला आनंद झाला असता, पण बाकी सर्व जण होते."

ही फूट का झाली? कुटुंबात काय बदल घडले? याविषयी अधिक बोलताना शरद पवार यांनी सांगितले की, बारामतीत १९६७ पासून ही परंपरा आहे. पण यंदा प्रथमच शरद पवार यांची दिवाळी गोविंद बागेत साजरी झाली, तर अजित पवारांनी काटेवाडीत दिवाळी साजरी केली.Baramati Diwali Padva 

राज्यातील आर्थिक स्थिती गंभीर: Sharad Pawar यांचे विधान 

राज्यातील आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, "राज्यातील आणि देशातील आर्थिक स्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. विधानसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांत परिस्थिती सुधारेल का हे पाहावे लागेल."

पाडव्याच्या दिवशी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना त्यांनी असेही म्हटले की, "राज्यातील जनतेच्या जीवनात स्थिरता यावी, त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. मात्र, राज्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये यश आलेले नाही."

राज्य पहिल्या पाचात नाही? Sharad Pawar 

शरद पवारांनी केंद्रीय अर्थ विभागाच्या अहवालावरही चिंता व्यक्त केली. "जे राज्य कधी पहिल्या क्रमांकावर होते, आता त्याचे नाव पहिल्या पाचातही नाही," असे ते म्हणाले.

Tags
  • Older

    पवार कुटुंबात पाडव्याच्या दिवशी फूट? शरद पवार यांची स्पष्ट प्रतिक्रिया

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)