अमरावती (Amravati): प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेले विधान नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या राजकीय नात्याबद्दल चर्चेचा विषय ठरले आहे. "नवनीत राणा (Navneet Rana) यांना खासदार होऊ न देण्यामागे त्यांच्या पती रवी राणा यांचेच हात आहेत," असे खळबळजनक वक्तव्य बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) पुण्यातील एका कार्यक्रमात केले.
कडूंनी स्पष्ट केले की, Amravati अमरावतीमध्ये रवी राणा यांनी अनेक भाजप नेत्यांशी वाद घेतले, ज्यामुळे नवनीत राणा यांचा पराभव झाला. "एखाद्याला निवडणूक लढायची असते तेव्हा प्रत्येकाची मते समजून घेणे गरजेचे असते. मात्र, रवी राणा यांनी भाजप नेत्यांशी बिनबुडाचे वैर घेतल्याने नवनीत राणांना पराभव पत्करावा लागला," असे कडू म्हणाले.
अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे (Balwant Wankhade) विजयी
अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव केला. भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती, आणि अखेरीस वानखेडे यांनी बाजी मारली.
2019 मध्ये नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ (Anand Rao Adsul) यांचा पराभव करून लोकसभेत विजय मिळवला होता. यावेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढूनही त्यांना पराभव पत्करावा लागला.
