CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर

Khoj news 24
0

जळगाव (Jalgaon ) : Maharashtra Assembly Election 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री ( Devendra Fadanvis ) देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना फोर्स वन सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी फडणवीस ( Fadanvis ) यांच्यावर टीका करत विचारले की, CM "मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांना धोका आहे का?" राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

Girish Mahajan गिरीश महाजनांचा प्रत्युत्तर

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी Sanjay Raut  संजय राऊतांवर पलटवार करत म्हटले की, "गुप्तचर विभाग आणि आयबीच्या सूचनेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत Sanjay Raut उद्या PM पंतप्रधानांना झेड प्लस सुरक्षा का दिली असं काहीही बोलू शकतील. त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही." महाजनांनी पुढे असेही म्हटले की, "उद्धव ठाकरे Uddhav Thakarey यांच्या सुरक्षेबाबत काही झालं तरी राऊत गोंधळ घालतात."

Sanjay Raut संजय राऊतांच्या वक्तव्याचा अर्थ?

संजय राऊत Sanjay Raut यांनी विचारलं की, "फडणवीस यांना कोणापासून धोका आहे? मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेमुळे धोका आहे का?" राऊत म्हणाले की, "फोर्स वन पथक दहशतवादाशी लढण्यासाठी तयार करण्यात आले होते, ते आता फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी सागर बंगल्यावर तैनात केले जात आहेत."

महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमताने येणार: गिरीश महाजन Girish Mahajan 

महाजन यांनी Assembly Election विधानसभा निवडणुकांबाबत आश्वस्त होऊन सांगितलं की, "या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमताने येईल.Maharashtra Politics राज्यात ठिकठिकाणी बंडखोरी झाली असली तरी आम्ही सामंजस्याने हा प्रश्न सोडवू."
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)