मुख्यमंत्री शिंदे CM Shinde प्रचाराचा शंख फुंकणार! महायुतीच्या प्रचारासाठी शिंदेंची आघाडी
November 02, 2024
0
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) महायुतीच्या Assembly Election विधानसभा निवडणुकीतील प्रचारात आघाडी घेणार आहेत. BJP भाजपच्या आधी मुख्यमंत्री शिंदेच प्रचाराचा शुभारंभ करतील, आणि याची सुरुवात मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून होणार आहे. महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडताना, शिंदे सायंकाळी ६ वाजता शेरे पंजाब मैदानात अंधेरी पूर्वचे शिवसेना उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचारसभेला संबोधित करतील.
शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून दाखल केला असला, तरी प्रचाराचा प्रारंभ मात्र शिवसेनेच्या किल्ला असलेल्या मुंबईतून करणार आहेत. या पहिल्या प्रचार सभेसाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारी केली आहे, आणि मुख्यमंत्री शिंदे कोणते मुद्दे उचलून धरतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीतील रंगत
महायुतीतील भाजपच्या पारड्यात अधिक जागा पडल्या आहेत, तर महाविकास आघाडीत काँग्रेसने मोठा भाऊ म्हणून स्थान मिळवले आहे. दिवाळी संपल्यानंतर प्रचाराची धामधूम वाढणार असून, बंडखोरीमुळे वरिष्ठ नेत्यांना डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. राज्यातील मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री शिंदे महायुतीसाठी निर्णायक प्रचार करणार असून, या पहिल्या सभेतून प्रचाराचा उत्साह आणखी वाढण्याची शक्यता आहे.
