Nawab Malik नवाब मलिकांच्या जावयाचं निधन : कुटुंबावर दु:खाचा डोंगर

TV Marathi News
0

 मुंबई: Mumbai माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस Ajit Pawar अजित पवार गटाचे आमदार Nawab Malik नवाब मलिक यांचे जावई समीर खान


Sameer Khan  यांचं निधन झालं आहे. गेल्या चार आठवड्यांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरु होती. त्यांच्यावर ICU आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. १७ सप्टेंबरला कार अपघातात ते जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांची प्रकृती नाजूक होती. आज त्यांचं निधन झालं.

17 सप्टेंबरच्या सकाळी समीर खान, त्यांची पत्नी निलोफरसह क्रिटी केअर रुग्णालयात Criticle Hospital  नियमित तपासणीसाठी गेले होते. निलोफर Nilofer Malik या नवाब मलिर यांच्या थोरल्या कन्या आहेत. रुग्णालयातून निघाल्यानंतर निलोफर
आणि समीर खान कारची वाट पाहत थांबले होते. तेव्हा त्यांच्या कार चालकानं अचानक ऍक्सिलेटर दाबला. त्यामुळे कारनं वेग पकडला. ती सुसाट वेगात पुढे गेली आणि भिंतीला जाऊन धडकली. समीर खान कारसोबत फरफटत गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. Tv Marathi News 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)