Supreme Court Order सुप्रीम कोर्टाचे निर्देश: अजित पवार राष्ट्रवादीला 'घड्याळ' चिन्हाबाबत डिस्क्लेमर जारी करण्याचे आदेश

TV Marathi News
2

 

Maharashtra Election 2024 LIVE 

ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; घड्याळ चिन्हाबाबत ३६ तासांत अस्वीकरण प्रकाशित करण्याचा अल्टिमेटम!

                        

Ajit Pawar NCP to issue disclaimer in 'clock' symbol case

मुंबई: Maharashtra Assembly Election Update  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरून वादाला तोंड फुटले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने NCP  घड्याळ चिन्हाच्या NCP Symbol Clock  कथित गैरवापरावर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर सुप्रीम कोर्टाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला ३६ तासांच्या आत 'घड्याळ' चिन्हाबाबत अस्वीकरण प्रकाशित करण्याचा आदेश दिला आहे.


लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, ६ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टासमोर झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाने कोर्टाला आश्वासन दिले की, ३६ तासांच्या आत मराठी दैनिकांमध्ये घड्याळ चिन्हासंदर्भात अस्वीकरण प्रकाशित केले जाईल. या अस्वीकरणात असे नमूद केले जाईल की, घड्याळ चिन्ह वापरण्याचा अधिकार न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असून, निवडणुकीच्या कालावधीत ते चिन्ह त्यांच्या गटाकडून वापरले जात आहे.

Ajit Pawar अजित पवार गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टाच्या तोंडी निर्देशानुसार हे आश्वासन दिले आहे. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, हे सुनिश्चित करण्यात आले आहे.


Supreme Court सुप्रीम कोर्टाने अजित पवार Ajit Pawar यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 'घड्याळ'  NCP Symbol Clock चिन्ह वापरल्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, अजित पवार राष्ट्रवादीने पक्षाच्या कोणत्याही प्रचार साहित्यामध्ये, विशेषतः 'घड्याळ' चिन्हाच्या वापरात स्पष्ट डिस्क्लेमर देण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे मतदारांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गट यांच्यात चिन्हाच्या वापराबाबत वाद उभा राहिला आहे. कोर्टाने असे नमूद केले आहे की, ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर करताना मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून अजित पवार गटाने स्पष्टपणे उल्लेख करावा की, ते स्वतंत्र गट आहे.

#Sharad Pawar #Ajit Pawar #Ncp symbol Clock

Sharad Pawar शरद पवारांनी दाखल केली होती याचिका

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस NCP (अजित पवार) Ajit Pawar पक्षाला घड्याळ Clock  चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) Sharad Pawar  पक्षाने दाखल केलेल्या अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली. या अर्जाद्वारे शरद पवार यांनी अजित पवार यांना Assembly Election  विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली.

36 तासांच्या आत सूचना प्रकाशित करा

आजच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील बलबीर सिंग यांनी दावा केला की, “राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ‘घड्याळ’ चिन्ह वापरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या सर्व अटींचे पालन करत आहे. नवीन हमीपत्र प्रकाशित करण्यासाठी वृत्तपत्रांशी संपर्क साधला आहे.” यावर न्यायालयाने म्हटलं की, “तुम्ही वृत्तपत्रांमध्ये डिस्क्लेमर प्रकाशित करण्यासाठी वेळ का घेत आहात? आम्ही तुम्हाला दिवस देत नाही आहोत, आम्ही विचारत आहोत की तुम्ही हे किती तासांत करू शकता?” असा सवाल न्यायमूर्ती कांत यांनी केला. सिंग म्हणाले की, “दोन-तीन दिवसांत ते करता येईल.” त्यावर न्यायमूर्ती कांत सिंग म्हणाले, “२४ तासांच्या आत, किंवा जास्तीत जास्त ३६ तासांत तुम्ही वृत्तपत्रांमध्ये अस्वीकरण प्रकाशित करा.”

Post a Comment

2Comments

Post a Comment