पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सायकल बँक संकल्पनेतून विद्यार्थ्यांना मिळाली शैक्षणिक गती

TV Marathi News
0

 बच्चू कडू यांच्या संकल्पनेची राज्यात घेणार दखल Bachchu Kadu 

अचलपूर/प्रतिनिधी 

परिस्थिती अथवा साधनांअभावी गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडसर निर्माण होऊ नये.शिक्षणामध्ये गतिमानता यावी.यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सायकल बँक योजनेची Cycle Bank Scheme संकल्पना अंमलात आणून बच्चू कडू Bachchu Kadu यांनी स्वतःच्या आमदार  निधी मधील १ कोटी रुपये या योजनेसाठी उपलब्ध करून दिले. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.विशेष म्हणजे बच्चू कडू यांच्या या योजनेची राज्यात दखल घेतली जाणार आहे.

     



सामूहिक लाभाच्या तत्वाला अनुसरून या सायकली अचलपूर मतदारसंघात शाळांना देण्यात येऊन निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्याला शाळा सत्रासाठी सायकल देण्यात येईल व सत्राच्या शेवटी सायकल परत घेऊन ती सायकल दुसऱ्या सत्रात गरजवंत विद्यार्थ्याला देण्याचे नियोजन शाळा स्तरावर केले जाईल,तसेच पहिल्या टप्प्यात दोन हजार सायकल वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करत यापुढे ही योजना अमरावती जिल्ह्यात सुद्धा राबविण्यात येणार आहे.

एकीकडे साडी, किराणा सारख्या वस्तू वाटप करून जनतेला लाचार करणाऱ्या योजने पेक्षा बच्चू कडू यांनी ८० टक्के समाजकारण करत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची योजना अमलात आणल्याने अचलपूर मतदारसंघात या योजने मुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे.


     दारिद्र रेषे खालील विद्यार्थी,सैनिक,माजी सैनिक,अनाथ,एकलपालक, विधवा यांच्या मुलांना तब्बल १८०० सायकली पहिल्या टप्प्यात देण्यात आल्या.आणि पुढील २५०० सायकल वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या मोहिमे ची सुरुवात अचलपूर मतदार संघातून करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रात Maharashtra पहिल्यांदाच असा अभिनव प्रकल्प राबविल्या जात आहे.या योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करणे सोपे जाईल. दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात येईल आणि वर्षभरानंतर सदर सायकल दुसऱ्या Needy Students गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल याबाबत सर्व नियोजन आणि जबाबदारी संबधीत शाळा करेल अशी योजना आखण्यात आली असून ही योजना राज्यभर राबविण्यात आली तर अनेक विद्यार्थी शाळाबाह्य होण्यापासून परावृत्त होतील असा आशावाद बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

गरीब विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरतेय ही योजना


ग्रामीण भागात अनेक गरीब विद्यार्थी दळणवळणाच्या सोयीअभावी शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षणाची आवड असूनही विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सायकल बँकच्या माध्यमातून अश्या विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येईल. आणि त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र पूर्ण झाल्यानंतर सदर सायकल दुसऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना देण्यात येईल त्यामुळे ही योजना गरीब विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)