महाराष्ट्राच्या सेवेसाठी एक मत द्या-
बच्चू कडू Bachchu Kadu यांनी मतदारांना घातली साद
Maharashtra Vidhan Sabha Election Update
चांदूर बाजार (प्रतिनिधी)
अचलपूर व चांदूर बाजार बाजार Achalpur Chandur ही संतांची भूमी असून सेवा हेच कर्म आहे. या सेवेचा अधिक आनंद घेण्यासाठी आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आपले केवळ एक मत द्या अशी साद बच्चू कडू यांनी मतदार संघातील मतदारांना घातली. शेतकरी, शेतमजूर ,दिव्यांग, कामगार व कष्टकरी घटकांचे लढवय्ये योद्धा म्हणून सर्वत्र परिचीत असलेले परिवर्तन महाशक्ती चे उमेदवार प्रहारचे संस्थापकअध्यक्ष बच्चू कडू यांच्या चांदूर बाजार स्थित आनंद सभागृह येथील प्रचार कार्यालया चे उपस्थित मतदारांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या उद्घघाटन प्रसंगी बच्चू कडू Bachchu Kadu Speech बोलत होते.
आपण सर्वजण सेवेचा झेंडा घेऊन निवडणुकीला सामोरे जात असून हा सेवेचा घोडा येथे थांबायला नको असे सांगून रुग्णांच्या सेवेसाठी संपूर्ण राज्यात रुग्णसेवकांची फौज निर्माण करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. बदल व परिवर्तनासाठी सर्व मतदारांनी परिवर्तन महाशक्ती आघाडी व प्रहारच्या मागे उभे राहून आपली खंबीर ताकद पाठीशी उभी करावी असे आवाहन देखील यावेळी बच्चू कडू यांनी केले.
बच्चू कडू यांच्या चांदुर बाजार येथील प्रचार कार्यालयाचे थाटात उदघाटन झाले.बच्चू कडू यांनी सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. जनसेवेचा वसा जोपासणाऱ्या बच्चू कडू यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन सामान्य मतदारांच्या हस्ते करून खऱ्या अर्थाने मतदारांची ताकद काय असते हे या निमित्ताने बच्चू कडू यांनी दाखवून दिले. Bachchu Kadu बच्चू कडू हे जनसामान्यांचे नेते आहेच शिवाय युवा वर्गाचे आयकॉन देखील ते आहेत.
बारी समाजाचे नेते अशोक वसुले ,जयकुमार चर्जन, जयंतराव गवई ,गौतम गुडदे,जितू दुधाने, राजेंद्र भुगुल, रहमान भाई ,राजेंद्र याऊल शैलेश निरगुडे ,हेमंत तडस, मंगेश देशमुख, संतोष किटुकले ,राजेंद्र गायकी घोडे काका ,लतीफ खान ,बंडू कुयटे ,घनश्याम पेठे दिवाकर तायवाडे,दिनेश अंधारे ,बाळासाहेब वाकोडे, रमेश पळसपगार, मोहन खंडारे , अबूदादा वानखडे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार कार्यालय उद्घघाटन सोहळ्यास बेबी चव्हाण, माधुरी सोळंके, सुशीला पाटणकर, सिंधू गवई, बिरजूला मोहोळ ,राजकन्या आठवले, पूजा तायडे, रुखमा राऊत, रेखा कांबळे, आशा इंगळे ,मंजू तंतरपाळे, बहिणाबाई रंगोली, अरुणा मनोहरे, शारदा इंगळे या मातृशक्तीसह अभिजीत हिरेमठ, जय नाईक, अभिषेक निरगुडे, सम्यक शिरसाट, अभिजीत शिरसाट ,आनंद तायडे, रोशन तायडे, रवी इंगळे, अभय तायडे ,प्रवीण मोहोळ, अनुराग मनोहरे, प्रफुल्ल मोहोळ, अभिषेक राठोड, रोहित जवंजाळ व प्रहार पदाधिकारी व असंख्य प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या ताकदीमुळे भाजपने दिला डमी उमेदवार
गेल्या चार निवडणुकीत आपण सर्व मतदारांनी जी मोठी ताकद माझ्यामागे उभी केली ती ताकद व शक्ती लक्षात घेता अडचणीत सापडलेल्या भाजपने यावेळी डमी उमेदवार दिल्याचा दावा बच्चू कडू यांनी याप्रसंगी बोलतांना केला .समोर पंजा दिसत असला तरी मागून त्याला कमळ धक्का देत असल्याचे सांगून यावेळी त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असा आत्मविश्वास देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
बॅटने BAT SYMBOL मतांचा डोंगर उभा करणार
प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी उपस्थित मातृ शक्तीने बच्चू कडू Bachchu Kadu यांचे औक्षण करून त्यांना विजयाचा आशीर्वाद दिला. बच्चू कडू यांनी गेल्या वीस वर्षात महिलांकरिता मोठे कार्य केले असून अनेक महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत न्याय दिला. तळागाळातील प्रत्येकाला सांभाळून घेत न्याय मिळवून देणाऱ्या बच्चू कडू यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीची आणखी काही वर्ष गरज असल्याच्या भावना मातृशक्तीने व्यक्त करीत बच्चू कडू Bachchu Kadu यांची Bat बॅट घराघरात पोहोचून विधानसभा निवडणुकीत बॅटने मोठी फटकेबाजी करीत धावांच्या रूपाने मतांचा डोंगर उभा करणार असा निर्धार उपस्थित महिलांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार
निवडणुकीच्या काळात Achalpur Assembly Constituency अचलपुर मतदार संघातील काँग्रेस, congress भाजप BJP आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP कारकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम करत प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करून बच्चू कडू Bachchu Kadu यांचे हात बळकट केले आहे. दररोज शेकडो कार्यकर्ते प्रहार मध्ये दाखल होत असून काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अचलपूर तालुकाध्यक्ष गजानन तट्टे यांनी सुद्धा शेकडो कार्यकर्त्यांसह प्रहारमध्ये प्रवेश केला असून यामुळे अचलपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडली असल्याचे चित्र आहे.






