PM Narendra Modi :
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी Maharashtra Vidhan Sabha Election पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांची आज अकोले येथे सभा झाली. या सभेत बोलताना पीएम मोदी यांनी काँग्रेसवर एक गंभीर आरोप केला. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसने 700 कोटींची वसुली केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
महायुती सरकारची पुढची पाच वर्ष कशी असतील, याची एक झलक महायुतीच्या वचननाम्यात दिसतेय. महिला सुरक्षा, महिलांना संधी, माझी लाडकी बहिण योजनेचा विस्तार. युवा वर्गासाठी लाखो रोजगार. विकासाच्या योजना. महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासाला डबल स्पीडने पुढे नेईल. युवा शिक्षा, रोजगार महायुतीच सरकार करील स्वप्न साकार” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोले येथील प्रचार सभेत बोलले.
महायुतीच्या या घोषणापत्रादरम्यान महाआघाडीच घोटाळापत्र आलय. देशाला माहितीय महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, महाआघाडी म्हणजे हजारो कोटींचे घोटाळे, महाआघाडी म्हणजे पैसा काढणं, महाआघाडी म्हणजे टोकन मनी. महाआघाडी म्हणजे ट्रान्सफर पोस्टिंगचा धंदा” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

