निवडणूक कर्तव्यावरील 11 हजारांचे पोस्टल बॅलेटने मतदान

TV Marathi News
0

 निवडणूक कर्तव्यावरील 11 हजारांचे पोस्टल बॅलेटने मतदान


अमरावती, दि. 9 : Amravati District 8 Assembly Constituency जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर 11 हजार 248 अधिकारी-कर्मचारी असणार आहेत. त्यांच्या मतदानाची सोय पोस्टल बॅलेटने करण्यात येणार आहे. दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या सर्वांना मतपत्रिका देण्यात येणार असून त्यांची मतदानाची सोय विधानसभा मतदारसंघनिहाय सुविधा केंद्रात केली जाणार आहे. 

येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना घरून मतदान करण्याची सुविधा दिली आहे. घरून होणारे हे मतदान मतपत्रिकेद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात 2 हजार 422 ज्येष्ठ नागरिक, तर 440 दिव्यांग मतदार यांच्यासोबतच 11 हजार 248 अधिकारी, कर्मचारी असे एकूण 16 हजार 972 मतदार मतपत्रिकेद्वारे मतदान करणार आहेत.


निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाची सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून दिली जाते. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून प्रथम प्रशिक्षणादरम्यान पोस्टल बॅलेटने मतदान करण्यासाठी फॉर्म 12 भरून घेण्यात आला. सदर फॉर्म भरून दिलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना त्यांनी विनंती केलेल्या विधानसभा मतदारसंघाची मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाते. तसेच या मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठी सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात येते. या सर्व कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान दि. 12 आणि दि. 13 नोव्हेंबर रोजी मतपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.

जिल्ह्यातील निवडणूक कर्तव्यावर असलेल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघातील 2 हजार 315, बडनेरा 1 हजार 973, अमरावती 2 हजार 750, तिवसा 1 हजार 452, दर्यापूर 2 हजार 237, मेळघाट 1 हजार 772, अचलपूर 2 हजार 315 मोर्शी 2 हजार 158 असे एकूण 16 हजार 972 मतदार मतदान करणार आहेत. या सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय सुविधा केंद्रातून मतदान करता येणार आहे.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)