Bacchu Kadu छाले पडले तरी थांबले नाहीत पावलं! बच्चू कडू यांची 'सातबारा कोरा यात्रा' ६व्या दिवशी जोमात
भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी रिया तोडसाम यांचा सहभाग
प्रतिनिधी | अमरावती | tvmarathinews.in
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेली प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांची 'सातबारा कोरा यात्रा' आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. पापल गावातून सुरू झालेली ही १३८ किलोमीटरची पदयात्रा आज पाचव्या दिवशी तिवरी गाव पार करत पुढे सरकली.
https://youtu.be/BHCbE0_HZn8
Bacchu Kadu Live : भाजपा आमदाराच्या पत्नी रिया तोडसामचा पाठिंबा – सातबारा कोरा यात्रेला बळ
सततच्या पावसामुळे आणि पथरी रस्त्यांवरून चालल्यामुळे बच्चू कडू यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या पायांवर फोड-छाले झाले. काही काळ नंगे पायांनी चालण्याची वेळ आली. तरीदेखील त्यांनी थांबण्याऐवजी मरहमपट्टी करून पुन्हा जोमात पदयात्रा सुरू ठेवली आहे.
पदयात्रेत आता शेतकऱ्यांसह समाजाच्या विविध घटकांचा
सहभाग वाढताना दिसत आहे. आज दिग्रस तालुक्यातील धानोरा गावात भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी रिया तोडसाम यांनी स्वतः उपस्थित राहून बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. त्याचबरोबर मानोरा तालुक्यातील *सोयजना ग्रामपंचायतीने* 'सातबारा कोरा यात्रा'ला पाठिंबा देणारा ठराव सर्वसंमतीने मंजूर केला, हे विशेष उल्लेखनीय.
आजच्या पदयात्रेत दिव्यांग बांधव देखील व्हीलचेअरवरून सहभागी झाले. एक युवक 'बटेंगे तो कटेंगे, जुडेंगे तो इतिहास बनाएंगे' असा संदेश असलेला टी-शर्ट घालून उपस्थित राहिला. हे पाहून बच्चू कडू यांनी म्हणाले – *"बटेंगे तो कटेंगे, पण जुडू तर इतिहास घडवू!"*
या पदयात्रेमध्ये दररोज हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी व सातबारा कोरा करण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाने आता जनआंदोलनाचा आकार घेतला आहे.
- मुख्य मुद्दे:
* बच्चू कडू यांच्यासह समर्थकांच्या पायांवर छाले, तरीही यात्रा सुरू
* सोयजना ग्रामपंचायतीचा बच्चू कडूंच्या आंदोलनाला ठरावाद्वारे पाठिंबा
* भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या पत्नी रिया तोडसाम यांचा सहभाग
* दिव्यांग नागरिक व युवकही सहभागी; समाजाच्या सर्व थरांचा प्रतिसाद
बच्चू कडू, सातबारा कोरा यात्रा, धानोरा गाव, रिया तोडसाम, प्रहार जनशक्ती पक्ष, किसान आंदोलन
#सातबारा\_कोरा #BacchuKadu #कर्जमाफी #प्रहार #SatbaraYatra #AmravatiNews #TVMarathiNews #शेतकरीआंदोलन
.jpg)
