Paratwada बिच्छन नदीत दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू

TV Marathi News
0

 Paratwada बिच्छन नदीत दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू


बुरडघाटमध्ये शोककळा 



११ जुलै २०२५ | प्रतिनिधी - अचलपूर - अचलपूर तालुक्यातील बुरडघाट गावात गुरुवारी (११ जुलै) दुपारी घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला सुन्न करणारी ठरली आहे. गावालगतच्या बिच्छन नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या दोन बालकांचा खोल डोहात बुडून मृत्यू झाला आहे.

Paratwada दुर्दैवी घटना | बिच्छन नदीत दोन बालकांचा बुडून मृत्यू; बुरडघाट गावात शोककळा



https://youtu.be/RqmhS4wwv20

Paratwada दुर्दैवी घटना | बिच्छन नदीत दोन बालकांचा बुडून मृत्यू; बुरडघाट गावात शोककळा

मृतांमध्ये भावेश रवि चौरासे (वय १९) आणि दीपक तुलसीदास ब्राम्हणे (वय १०) यांचा समावेश आहे. हे दोघेही आपसात नात्याने आतेभाऊ व मामेभाऊ होते. गुरुवार दुपारी तीनच्या सुमारास गावातील पाच मुले बिच्छन नदीवर आंघोळीसाठी गेली होती. यामध्ये भावेश आणि दीपक हे दोघे खोल पाण्यात गेल्याने बुडाले.


सोबतच्या इतर तिघांनी आरडाओरड करत ही माहिती गावात कळवली. माहिती मिळताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना बाहेर काढून अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


भावेश गौरखेडा कुंभी येथील एका खाजगी शाळेत इयत्ता पाचवीत तर दीपक इयत्ता चौथीत शिक्षण घेत होता. दोघांचेही बालपण उज्वल भविष्याच्या स्वप्नांनी भरलेले असताना घडलेली ही घटना गावासाठी दुःखद ठरली आहे.



गावात शोककळा पसरली असून शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी या बालकांना अश्रुपूरित श्रद्धांजली अर्पण केली आहे. या घटनेनंतर बिच्छन नदी परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.



भावपूर्ण श्रद्धांजली


गावातील नागरिक, शाळा प्रशासन आणि नातेवाईकांनी दोन्ही बालकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. "ही घटना आमचं भविष्य हिरावून नेणारी आहे," अशा शब्दांत ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केलं.


ताज्या अपडेटसाठी वाचा: [www.tvmarathinews.in](https://www.tvmarathinews.in)

📲 **Follow Us:**


 #TvMarathiNews #बिच्छननदी #बालमृत्यू #अचलपूर


-

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)