“सातबारा कोरा कोरा” यात्रेचा चौथा दिवस – बच्चू कडू यांच्या पायाला जखमा, सरकार अजूनही गप्प!
"सातबारा कोरा कोरा..." या घोषणांनी गगन भरून टाकणारी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभी असलेली ही ऐतिहासिक पदयात्रा आता चौथ्या दिवशी खडतर टप्प्यात पोहोचली आहे.
सलग तीन दिवस संततधार पावसातही ठामपणे सुरू असलेली ही यात्रा वळसा – लालखिंड – तिवरी या दुर्गम मार्गावरून सुरू आहे.
या प्रवासात, स्वतः प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या पायाला खोल जखमा झाल्या…
कार्यकर्त्यांनी थांबण्याचा आग्रह धरला… पण बच्चू कडू म्हणाले:
मातीत चालणाऱ्या गरीब शेतकऱ्याचे दुःख माझ्या पायांच्या जखमांपेक्षा खोल आहे... त्यामुळे थांबणं शक्य नाही!”
औषध लावलं, पट्टी बांधली… आणि पुन्हा सुरू केला लढा… निर्धार तोच, वेदना अधिक, पण पायवाट न थांबणारी!
आजही सरकार गप्प आहे…
एसी केबिनमधून मंत्री बाहेर आलेले नाहीत…
शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत… आणि त्यांच्या मागण्या तशाच प्रलंबित…
कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागण्यांसाठी ही चळवळ नाही, तर एल्गार आहे!
या यात्रेदरम्यान बच्चू कडू यांनी अनेक शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेट दिली. त्यांच्या डोळ्यांतून निघणारे अश्रू, आज हृदय पिळवटून टाकत आहेत.
बच्चू कडू यांचा एल्गार:
"हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरू राहणार!
शेतकऱ्यांचा सातबारा जर कोरा झाला नाही… तर संघर्षाचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटेल!"
http://www.TvMarathinews.in वर आपल्याला मिळेल प्रत्येक पावलाची बातमी, शेतकऱ्याच्या दुःखाची खरी कहाणी आणि सरकारच्या मौनावर ठाम प्रश्न!
ही केवळ यात्रा नाही... ही महाराष्ट्रात पेटणारी चळवळ आहे!
बघत राहा, वाचत राहा –
👉 http://www.TvMarathinews.in




